अंगावर गाडी घालून उपनिरीक्षकाला जिवे मारण्याचा प्रयत्न

रहिमतपूर येथील घटना; मनससारखा तपास करत नसल्याने आरोपींचे कृत्य

सातारा,दि.18(प्रतिनिधी)

दाखल गुन्ह्याचा तपास मनासारखा करत नाही,म्हणून रहिमतपूर येथे पोलिस उपनिरीक्षकाला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक गणेश बाळनाथ जगदाळे यांनी रहिमतपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. रणजित आप्पासाहेब क्षीरसागर,नितीन किसन भोसले (दोघे रा. धामनेर,ता.कोरेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

यातील संशयीत आरोप हे पोलिस उपनिरीक्षक जगदाळे यांना एका गुन्ह्यात बेकायदेशीर काम करण्यास सांगत होते. मात्र त्या संबंधाने पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार नसल्याने जगदाळे यांनी त्यांना नकार दिला. त्यामुळे आरोपी चिडले होते. त्याचाच राग मानात धरून संशयितांनी जगदाळे यांच्या अंगावर गाडी घालुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

जगदाळे हे कर्तव्यासाठी शनिवारी रात्री 9 वाजता रहिमतपूर पोलिस ठाण्यात जात होते. त्यावेळी पोलिस ठाण्याच्या पाठीमागील गेटजवळ आले असताना संशयितांनी जगदाळे यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत जगदाळे गंभीर जखमी झाले.

दरम्यान जगदाळे यांच्या मदतीला येणाऱ्या लोकांनाही संशयितांनी धमकावत दहशत निर्माण केली. तसेच जखमी उपनिरीक्षक जगदाळे यांना कर्तव्यावर जाण्यास विरोध केला. घटनेची माहिती मिळताच सहय्यक पोलिस अधिक्षक समीर शेख यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर शेख यांनी तपासाच्या योग्य सूचना करत आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले. दाखल गुन्ह्याचा तपास हवालदार नायकवडी करत आहेत.

..आरोपांपासून जिवे मारण्यापर्यंत
काही दिवसापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्यावर आरोपीच्या नातेवाईकांनी पैसे घेतल्याचा गंभीर आरोप केला होता. अर्थात हा आरोप कारवाई केल्याच्या रागातून केला गेला होता. लोकशाहीत आरोप करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र मनासारखी कारवाई करावी म्हणून उपनिरीक्षकाला जिवे मारण्याचा प्रयत्न करणे म्हणजे जरा अतिच होत आहे. पोलिसांवर उचलले जाणारे हात आता तरी रोखायलाच पाहिजेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
39 :thumbsup:
2 :heart:
1 :joy:
2 :heart_eyes:
4 :blush:
6 :cry:
46 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)