अंगावर गाडी घालणाऱ्या एकास पोलीस कोठडी

पुणे – जुन्या वादातून अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी असे आदेश दिले आहेत.

रुपेश दत्तात्रय तावरे (24), राहुल एकनाथ पाटील उर्फ भगत (25, दोघेही, रा. दत्तवाडी, मुळशी) असे कोठडी सुनावण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी विशाल भालचंद्र पाटील (27, रा. दत्तवाडी, मुळशी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास एक्‍झरबीया सोसायटी, बिल्डिंगच्या पार्किंगच्या समोर, दत्तवाडी येथे घडली. फिर्यादी हे सोसायटीच्या पार्किंगमध्ये मित्रांशी गप्पा मारत उभे होते. यावेळी फिर्यादींचा भाऊ अजित पाटील हा त्यांच्याकडे पायी येत होता. त्याचवेळेस आरोपी रुपेश तावरे हा वेगात गाडी घेऊन अजित पाटील यांच्या दिशेने आला. यात पाटील यांना धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले. पुर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून त्यांने हे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे; तर आरोपी रुपेश याला गाडी चालवताना प्रोत्साहन दिल्याप्रकरणी त्यांचा गाडीतील साथीदार राहुल पाटील याच्यावर देखील गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, दाखल गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असून चालकाजवळ गाडी चालविण्याचा परवाना नाही. तसेच आरोपी याने नेमके कोणत्या कारणावरून जखमी यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. अरोपीचे पूर्व रेकॉर्ड तपासायचे असल्याच्या कारणावरून त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. न्यायालयाने ती मंजूर केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)