अंगापूर वंदन येथील एकाचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू

नागठाणे – अंगापूर वंदन (ता. सातारा) येथील अनंत आप्पाजी कणसे (वय 50) यांचा रविवारी पहाटे पुणे येथील रूबी हॉस्पिटलमध्ये स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. यामुळे अंगापूर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अनंत कणसे यांना सर्दी, खोकला व तापाचा त्रास उद्‌भवला होता. यासाठी त्यांनी गावातील खाजगी दवाखान्यात उपचार घेतले होते. परंतु, दोन-तीन दिवसानंतरही काहीच फरक न पडल्याने घरातील सदस्यांनी त्यांना पुढील उपचारासाठी सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. याठिकाणी त्यांनी बरे वाटत नसल्याने तसेच श्वास घेण्यास त्रास होवू लागला.

-Ads-

यावेळी त्यांची अधिक तपासणी केले असता कणसे यांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना तातडीने पुणे येथील रूबी हॉस्पिटलला हलविण्यात आले होते. गेली पंधरा ते वीस दिवसांपासून त्यांच्यावर याठिकाणी उपचार सूरू होते. परंतु, रविवारी पहाटे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)