अंगापुरातील एकतरी मल्ल भविष्यात ऑलिंपिकवीर व्हावा : आ. शिंदे

राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत अंगापुरातील मल्लांचे देदिप्यमान यश

नागठाणे – राजकीय, शैक्षणिक परंपरा असणाऱ्या व कुस्तीची पंढरी असणाऱ्या अंगापुरातून भविष्यात ऑलिंपिक पदकाला गवसणी घालणारा एखादा मल्ल यातून निश्‍चित उदयाला येईल, असे मत आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.

-Ads-

क्रीडा व युवकसंचलनालय यांच्यावतीने पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत दैदिप्यमान यश संपादन करणाऱ्या अंगापुरातील मल्लांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की काळाची पर्वा न करता येणाऱ्या अडचणींनवर मात करून यशस्वी होती येते हेच या खेळाडूंनी सिध्द करून दाखविले. यातूनच एखादा मल्ल ऑलिंपिकसाठी पात्र होवून पदकाला गवसणी घालेल हेच आजच्या सत्काराचे फलीत असेल.

हनुमान व्यायाम मंडळाचे मल्ल 14 वर्षे वयोगटात महिला मल्ल सिध्दी कणसे, (54 कि.लो) कामट्या पवार, (68 कि. लो) वजन गटात यांनी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत तर वैष्णवी कणसे हीने रग्बी स्पर्धेत प्रथम क्रमांकासह राष्ट्रीय स्पर्धेत धडक मारली. तर वैभव शेडगे, प्रतिक कणसे, अश्‍विन भुजबळ, स्वयंम कणसे, साहिल कणसे गौरी कणसे, यांनी विभागीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केलेबद्दल या सर्वांचा हनुमान व्यायाम मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने आ. शिंदे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी वरद फाउंडेशन यांच्यावतीने या यशस्वी मल्लांना प्रत्येकी दहा हजार रूपये किमतीचे कुस्तीचे किट, तर माजी सभापती नारायण कणसे यांच्यावतीने रूपये दहा हजार प्रोत्सानपर बक्षीस आ. शिंदे यांचे हस्ते देण्यात आले. या सत्कार सोहळ्यास जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, जिल्हा सहकार बोर्डाचे अध्यक्ष धनंजय कदम-शेडगे, अजिंक्‍यतारा कारखान्याचे उपाध्यक्ष विश्‍वास शेडगे-पाटील, अजिक्‍यतारा कारखान्याचे संचालक रमेश कणसे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सतिश चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रवक्ते संतोष कणसे, राजेद्र कणसे कुस्ती कोच जितेंद्र कणसे, अमर कणसे, पै. जगन्नाथ भुजबळ, पै. महादेव कणसे, आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवराचे ग्रामस्थांच्यावतीने पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आले.

या सर्व मल्लांची गावाच्यावतीने सवाद्य संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी त्यांचे सुवासणींच्या हस्ते औक्षण करण्यात आले. चौकात फटाक्‍याची आतषबाजी करण्यात आली. या मिरवणूकीत न्यू इंग्लिश स्कूल व प्राथमिक शालेय विद्यार्थी व शिक्षक, ग्रामस्थ ,पंचक्रोशीतील कुस्तीप्रेमी, मोठ्या संख्येंने उपस्थित होते. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन आनंदराव कणसे यांनी केले. आभार कुस्ती कोच अमर कणसे यानी मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)