अंगणवाडी सेविकांवरील ‘मेस्मा’ कायदा अखेर स्थगित

मुंबई – अंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेला मेस्मा कायदा स्थगित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी त्यांनी मेस्मा कायदा स्थगित करण्याची घोषणा केली. कायद्याला स्थगिती देणे म्हणजे विरोधकांनी आणलेल्या दबावाचा विजय आहे. शिवाय, राज्य सरकारला उशिरा आलेले शहाणपण असल्याचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

मेस्मा कायद्याविरोधात शिवसेनेसह विरोधक आक्रमक झाले होते. हा कायदा त्वरित रद्द करावा, या मागणीवरुन विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला होता. विधानसभेत आक्रमक झालेले शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांनी विधानसभा अध्यक्षांचा राजदंडही पळवला होता. अत्यंत कमी मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना अत्यावश्‍यक सेवेखाली मेस्मा लावायचाच असेल तर त्यांनाही इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे मानधन द्या, अशी मागणी शिवसेनेसह विरोधकांची होती. मात्र महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे मेस्माच्या भूमिकेवर ठाम होत्या. काही दिवसांपूर्वी अंगणवाडी सेविकांनी मुंबईत आंदोलन केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
1 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)