अंगणवाडी सेविकांवरच्या ‘मेस्मा’वर सरकार ठाम

संग्रहित फोटो

मुंबई : अंगणवाडी सेविकांवरचा मेस्मा हटववण्यासाठी विधानसभेत आज विरोधकांसह शिवसेना देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तब्बल ८ वेळा तहकुबीनंतर विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी ठप्प पडले. दरम्यान, या सर्व घडामोडीत सरकार मात्र मेस्मावर ठाम राहिले.

अंगणवाडी सेविकांना लावलेला मेस्मा कायदा रद्द करण्यावरून आज विधानसा आणि विधान परिषदेत जोरदार रणकंदन पाहायला मिळाले. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. तत्पूर्वी शिवसेनेसह विरोधी पक्षाच्या आमदारांनी याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला. विरोधकांनीही शिवसेनेच्या मागणीला जोरदार समर्थन देत गोंधळ घातला. त्यामुळे विधानसभेचे कामकाज आठ वेळा तहकूब करावे लागले. अंगणवाडी सेविकांना मदत करण्याची सरकारची भूमिका नसल्याचा आरोप अजित पवारांनी केला. तर याबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पीपणाची आहे.

मंत्रिमंडळात मेस्मा कायदा लागू करण्याचा निर्णय झाला तेव्हा शिवसेना मंत्री गप्प का बसले, असा सवाल विखे पाटलांनी केला. दरम्यान, विनोद तावडेंनी सरकारची बाजू आक्रमकपणे लावून धरण्याचा प्रयत्न केला. मेस्मा कायदा हटवणे शक्य नसल्याचे महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंनी ठासून सांगितले. त्यामुळे गदारोळ होऊन कामकाज पुन्हा पुन्हा तहकूब करावे लागले.शेवटी सभागृहाचे काम दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)