अंगणवाडी सेविकांना बाप्पा पावला !

मानधनात वाढ: पुढील महिन्यापासून मिळणार लाभ 
नवी दिल्ली: देशभरातील अंगणवाडी सेविकांना केंद्र सरकारने दिलासा आहे. त्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही वाढ पुढील महिन्यापासून लागू होणार आहे. याचा लाभ सुमारे 14 लाखांपेक्षा जास्त अंगणवाडीसेविकांना होणार आहे.
नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आशा आणि अंगणवाडी सेविकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यादरम्यान त्यांनी माधनात वाढ करण्याची घोषणा केली. आतापर्यंत ज्यांना 3 हजार रुपये मिळत होते, त्यांना आता 4 हजार 500 रुपये मिळणार आहेत. त्याचप्रमाणे ज्यांना 2 हजार 200 रुपये मिळत होते. त्यांना 3 हजार 500 मिळणार आहे. अंगणवाडी मदतनीसांचे मानधनही 1500 रुपयांवरुन 2,250 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे.
आशा कार्यकर्त्यांना मिळणाऱ्या नित्य प्रोत्साहनात दुप्पट वाढ पंतप्रधानांनी जाहीर केली. याखेरीज सर्व आशा कार्यकर्त्यांना आणि मदतनीसांना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत मोफत विमा संरक्षण दिले जाणार आहे.
तसेच कॉमन प्लिकेशन सॉफ्टवेअर’ (आयसीडीएस-सीएस) यासारखी तंत्रसाधने वापरणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना अतिरिक्त प्रोत्साहन पंतप्रधानांनी जाहीर केले. कामगिरीवर आधारित 250 रुपये ते 500 रुपये असेल.
यावेळी मोदी यांनी अंगणवाडीसेविकांच्या कार्याचे कौतुक केले. मोदी म्हणाले, देवाकडे हजारो हात असतात. म्हणजे देवाच्या शरिराला हात असतात असे नाही, तर त्यांच्यातर्फे काम करणारे अनेक लोक असतात. तुम्ही-अंगणवाडी सेविका माझे हात आहात. पोषणाचा थेट संबंध स्वास्थ्याशी आहे. त्यामुळे आमच्या सरकारने झुंझुनू राष्ट्रीय पोषण मिशनची सुरुवात केली आहे. हे आमच्यासाठी मोठे मिशन आहे. त्यासाठी आशा आणि अंगणवाडीसेविकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, अंगणवाडी सेविका/मदतनीसांच्या मानधनात वाढ करण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेमुळे पोषण अभियानांतर्गत सेवा अधिक सुधारेल, असा विश्‍वास महिला आणि बालविकास मंत्री मनेका संजय गांधी यांनी व्यक्‍त केला आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)