अंगणवाडी सेविकांना ‘इतकं’ कमी मानधन का ?- अजित पवार

मुंबई – अंगणवाडी सेविका आणि सरकारमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आपल्या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी संप पुकारला होता. या कर्मचाऱ्यांवर सरकारकडून मेस्मा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान अंगणवाडी सेविकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी विरोधकांकडून विधानपरिषदेमध्ये करण्यात आली.सरकारने अंगणवाडी सेविकांबाबत घेतलेल्या भूमिकेवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येतीये.

पाच हजाराच्या तुटपुंज्या पगारात आज कुणीही काम करत नाही. शेतामध्ये मजुरी करणाऱ्या भगिनींना देखील ३०० रुपये रोजंदारी मिळते.मग सरकार अंगणवाडी सेविकांना केवळ ५ हजार इतकं अल्प मानधन कसं देऊ शकतं.असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)