अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढण्याची शक्‍यता

पुणे – महापालिकेकडून अंगणवाडी सेविका व बालवाडी शिक्षिकांना देण्यात येणारे मानधन कमी असल्याने त्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर शिक्षिकांना 22 हजार रूपये तर, सेविकांना 17 हजार रूपये मानधन देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडून प्रशासनाच्या अभिप्रायासाठी पाठविण्यात आला आहे.

मागील स्थायी समितीमध्येही अशाच प्रकारचा प्रस्ताव आला होता, त्यामुळे या दोन्ही प्रस्तावांचा अभिप्रात पुढील आठ दिवसांच्या आत सादर करण्याच्या सूचना यावेळी प्रशासनास देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

महापालिकेच्या शाळांमध्ये 521 बालवाडी शिक्षिका असून 450 बालवाडी सेविका आहेत. महापालिकेकडून सद्यस्थित शिक्षिकांना दरमहा 8 हजार 500 तर, सेविकांना 6 हजार 250 रूपयांचे मानधन दिले जाते. या शिक्षिका तसेच सेविकांवर मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण होईल, यासाठी पाया रचण्याची प्राथमिक जबाबदारी असते. मात्र, हे काम करतानाच या कर्मचाऱ्यांना जनगणना, मतदार नोंदणी, पल्स पोलिओ मोहिम तसेच महापालिका व शासनाच्या इतर सर्वेक्षणाची कामे दिली जातात. आपली शिक्षकाची जबाबदारी सांभाळून त्यांच्याकडून ही कामे केली जातात. अशा स्थितीत या सेविकांना मिळणारे मानधन हे अतिशय तुटपूंजे आहे. ही बाब लक्षात घेता पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच राज्यातील इतर महापालिकांमध्ये शिक्षिका व सेविकांना मिळणारे वेतन लक्षात घेऊन बालवाडी शिक्षिकांना 22 हजार तर, सेविकांना 17 हजार रूपयांचे मानधन देण्यात यावे. तसेच रजा व वैद्यकीय सुविधाही देण्यात याव्यात, अशी मागणी या प्रस्तावात करण्यात आली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)