अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविकांनी मांडल्या व्यथा

संग्रहित फोटो

झेडपीतर्फे बैठक : प्रश्‍न सोडविण्याचे खासदार सुळे यांचे आश्‍वासन

पुणे – “पर्यवेक्षिकेला दरमहा पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा डाटा अपलोड करावा लागतो. माझ्याकडे 39 अंगणवाड्या आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी भेट देणे शक्‍य होत नाही. पंचायत समितीमध्ये जा, आधारचे काम बघा, “आकार’ उपक्रम, रजिस्टर अद्ययावत ठेवणे आदी कामे करावी लागतात,’ यांसह विविध अडचणींचा पाढा खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर वाचून दाखवण्यात आला.

जिल्हा परिषदेअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका आणि मदतनीस यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खासदार सुळे यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक पार पडली. त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसेपाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, सभापती राणी शेळके, सुजाता पवार आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपक चाटे उपस्थित होते.

त्यावेळी सुळे यांनी अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि सेविका यांनी मांडलेल्या समस्या सोडविण्याचे आश्‍वासन देत त्या चांगले काम करत असून पुरंदरमध्ये सुरू असलेल्या “आकार’ उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. तसेच अंगणवाड्यांना वीज आणि पाण्याची सुविधा मिळण्याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. जिल्ह्यातील कुपोषणाच्या समस्येकडे गांभिर्याने पाहण्याच्या सूचना देत इंटरनेट कनेक्‍टिव्हिटीसंदर्भात विशेष लक्ष देऊन समस्या सोडवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी “बाराशे ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी असून त्याठिकाणी तुम्हाला काही वेळ अंगणवाडीचे काम करता येऊ शकते. ग्रामपंचायतीमध्ये संगणक आहेत, त्यासंदर्भात प्रत्येक ग्रामपंचायतींना कळवण्यात येईल,’ असे स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)