अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सुमारे 50 टक्के वेतन वाढ

25 लाख कर्मचाऱ्यांना होणार लाभ – जेटली
नवी दिल्ली – गेले काही दिवस सातत्याने केल्या जाणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीच्या प्रस्तावावर सरकारला आता जाग आली असून त्यांचे वेतन सुमारे 50 टक्‍क्‍यांनी वाढवण्यात येणार आहे. त्याचा अंगणवाडी कर्मचारी व आशा वर्कर्स अशा सुमारे 25 लाख लोकांना लाभ होणार आहे अशी माहिती अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आपल्या फेसबुक ब्लॉग वरती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की ही मागणी बऱ्याच दिवसांपासूनची होती पण अर्थसंकल्पावरील दबावाच्या कारणामुळे त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देता आले नव्हते पण आणि आता मात्र सरकारने आर्थिक अडचणीतून मार्ग काढून त्यांच्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंगणवाडी व आशा कर्मचाऱ्यांना ऑक्‍टोबर पासून वेतनवाढ दिली जाईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे वेतन आता तीन हजार रूपयांवरून साडे चार हजार रूपये प्रति महा इतके करण्यात आले असून मिनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 2250 रूपयां ऐवजी 3500 रूपये इतकी वेतनवाढ दिली जाणार आहे.

-Ads-

अंगणवाडी सहायकाला 1500 रूपयांऐवजी 2250 रूपये इतके वेतन दिले जाणार आहे. तसेच त्यांना कामाच्या योग्यतेच्या आधारे दर महा 250 रूपये ते 500 रूपये इतके इन्सेंटिव्ह दिले जाणार आहे. सध्या देशात 12 लाख 90 हजार अंगणवाडी कर्मचारी आणि 11 लाख 60 हजार सहायक कार्यरत आहेत. त्यामुळे देशातील 24 लाख 90 हजार कुटुंबाना याचा लाभ होईल


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
8 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
2 :blush: Great
3 :cry: Sad
3 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)