अंगणवाडी कर्मचारी केला “थाळी नाद’

राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे विविध मागण्यांचे दिले निवेदन

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 10 – महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने त्यांच्या विविध मागण्यांसाठी समाजकल्याण आयुक्त कार्यालय आणि पुणे जिल्हा परिषदेसमोर शुक्रवारी (दि. 10) “थाळी नाद’ आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्मचारी संघाकडून महिला व बाल विकास विभागाचे विभागीय उपायुक्त दिलीप हिरवळे आणि जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती राणी शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपक चाटे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी कर्मचारी संघाचे सचिव निलेश दातखिळे, सहसचिव विठ्ठल करंजे, सुनीता लोंढे, रेखा कांबळे, मंजुळा झेंडे, सविन्द्रा बोऱ्हाडे, सुमन फदाले, शैलजा कोरहळे, शारदा शिंदे, अनिता गुंजाळ यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

25 पेक्षा कमी मुले असलेले अंगणवाडी केंद्र बंद करून, शेजारच्या अंगणवाडी केंद्रात त्या बालकांचा समावेश करावा. हा राज्य शासनाचा आदेश त्वरीत रद्द करावा, या प्रमुख मागणीसह अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन प्रत्येक महिन्याच्या एक तारेखाला व्हावे, कर्मचाऱ्यांना कायम कर्मचारीचा दर्जा देवून त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते लागू करावे, कर्मचाऱ्यांचे थकीत टीएडीए आणि इंधन बिल त्वरीत देण्यात यावे, सेवासमाप्ती लाभामध्ये तिपटीने वाढ करा, राज्य शासनाने 2017-18 मध्ये जाहीर केलेली भाऊबीजची रक्कम त्वरीत मिळावी, गणवेशासाठी दरवर्षी एक हजार रूपये मिळावे, लाईन लिस्टिंग च्या व आधार नोंदणीच्या कामाची सक्ती बंद करणे, नगरपालिका व महानगरपालिकाकडे अंगणवाडी केंद्राचे होणारे हस्तांतरणचा आदेश त्वरित रद्द करावा, मिनी अंगणवाडी केंद्रांचे रूपांतर नियमित अंगणवाडी केंद्रात रूपांतर करा, अंगणवाडी केंद्रांचे भाडे नवीन परिपत्रकाप्रमाणे द्या, अशा विविध मांगण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी आंदोलन केले.

आंदोलनाच्या वेळी अंगणवाडी सेविकांनी घोषणाबाजी “थाळी नाद’ केला. तसेच मदतनीस आणि सेविकांच्या प्रश्‍नाबाबत त्वरीत बैठक घेऊन त्यावर निर्णय घ्यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी सरला उडणे, नयना वाळुंज, सिता मिसाळ, छाया भुजबळ, सुरेखा शिनगारे, भाग्यश्री जोशी, रंजना कानडे, शहेनाज पठाण, बिलकीज काझी, रशीदा बेग, शाहीन आरकाठी, सुरेखा कारंडे, निता पायगुडे, बिस्मिल्ला तांबोळी, संगीता रायकर, सविता रायकर, स्वाती भेगडे, सारिका रूपवते, उज्वला देडगे यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)