अंगणवाडीला कपाट, दरवाजा तर शाळेला वृक्षभेट

वाकड – ताथवडे येथील सामाजिक कार्यकर्ते पै. सचिन पवार यांच्यावतीने एका शाळेस 25 वृक्षांची भेट देण्यात आली, तर परिसरातीलच एका अंगणवाडीची गरज पाहून नवीन कपाट व दरवाजा देण्यात आला. या दोन्ही उपक्रमांचे आयोजन स्व. बाबुराव ऊर्फ आण्णासाहेब पवार सोशल फाउंडेशन, मल्हार प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले.

याबाबत प्रतिष्ठानच्या बतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार वै.भिकोबा सोपान भुजबळ प्राथमिक शाळा माळवाडी(पुनावळे)क्र.105 या शाळेला शाळा समिती व महापौर भेट देणार होते. यानिमित्ताने शिक्षक व विद्यार्थी सुशोभीकरण करत होते. शाळेच्या सुशोभीकरणासाठी दोन्ही संस्थांच्या वतीने 25 वृक्ष भेट देण्यात आले. विद्यार्थ्यांनी ही झाडे शाळेच्या परिसरात लावून या झाडांची जोपासना करण्याची ग्वाही यावेळी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एकात्मिका बालविकास सेवा योजना द्वारे ताथवडे येथील अंगणवाडीतील कपाट नादुरुस्त झाले तर दरवाजा मोडकळीस आला होते. तुटलेल्या दरवाजातून उंदीर, साप आत शिरत असल्याचा धोका पाहून अंगणवाडीला नवीन दरवाजा बसवून देण्यात आला तर साहित्य ठेवण्यासाठी चांगले कपाटही देण्यात आले. यावेळी पै.सचिन पवार यांनी चिमुकल्यांशी संवाद साधत त्यांना समजेल अशा पद्धतीने झाडांचे आणि शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)