अंगणवाडीत श्रावण संस्कृती महोत्सव उत्साहात

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील एकलहरे येथील लोंढेमळा अंगणवाडीत श्रावण संस्कृती महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राधाकृष्ण, भक्ती, रासनृत्य, भजन, गवळण, कपिला, महात्म्य, ज्ञानहंडी, वाचन आदी कार्यक्रम यावेळी झाले. यावेळी अंगणवाडी सेविका मनिषा संदिप बाणखेले, मनिषा घारे, मितल गावडे, सेजना लिगाडे, स्वाती लोंढे, अश्‍विनी सोनवणे समवेत एक ते सहा वयोगटातील मुले, मुली व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पालकांना ज्ञानहंडीच्या माध्यमातुन भारतीय संस्कृतीतील सणांचे महत्त्व, गोसंवर्धनातुन निसर्गाचे जतन, हंडीतील दूध, दही, ताक, तुप, लोण्याचे मानवी आहारातील महत्त्व, जीवनमुल्ये, अनिष्ट रुढींना तिलांजली आदींची माहिती देण्यात आली. यावेळी महिलांना आहारविषयक पुस्तकांचे वाटप करण्यात आले. संस्कार लोंढे, स्वराज लिगाडे, संस्कृती लोंढे या बालकांनी राधा कृष्णाची वेशभुषा परिधान करुन कृष्णलीला सादर केली. मनिषा घारे यांनी श्रावण संस्कृतीची माहिती सांगितली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)