अंगणवाडीत कार्यरत असलेल्या महिलांना पेन्शन लागू करा – पंढरीनाथ पुरी

संगमनेर : गेली अनेक वर्षापासून अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी ताई अल्पमानधनात शासनाची सेवा करतात. वय वर्षे ६५ नंतर त्या अतिवृद्ध होणार आहे. त्यावेळी त्यांना आर्थिक मदतीची गरज असणार आहे. यासाठी शासनाने सेवानिवृत्ती नंतर दरमहा रूपये चार हजार पेन्शन द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश अंगणवाडी महिला संघाचे प्रदेश सचिव पंढरीनाथ पुरी यांनी केली. ते ढवळपुरी ता पारनेर येथील अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी ताई यांच्या गट सभेच्या वेळी प्रमुख पाहुणे निमित्ताने बोलत होते.

यावेळी अध्यक्षस्थानी समाजसेवक शांताराम आहेर होते. तसेच याप्रसंगी प्रदेश संपर्क प्रमुख गंभीरे अण्णा यांच्या हस्ते उजाळा स्मरणिकेचे प्रकाशन करून वाटप करण्यात आले. तसेच प्रदेश महिला संघाचे प्र गो बागुल यांनी गटाच्या गट शाखा अध्यक्षा श्रीमती गुजर, व उपाध्यक्षा सांगळे यांची निवड सर्वानुमते केली. गटातील बहुसंख्य अंगणवाडी सेवेत कार्यरत असलेल्या महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचा गुजर यांनी समारोप केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)