अंगणवाडीतील मुलेही इंग्रजी बोलणार

टाकवे बुद्रुक – आजच्या जागतिकीकरणाच्या युगात जग म्हणजे छोटेसे गाव झाले आहे. नोकरी असो वा व्यवसाय इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवल्यास अतिरिक्‍त फायदा होऊ शकतो. ग्रामीण भागातील मुले इंग्रजी भाषेत मागे पडू नये म्हणून सुरुवातीपासूनच मुलांना मातृभाषेसोबत इंग्रजीमध्येही संभाषणाची कला अवगत व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आंदर मावळ विभागातील अंगणवाडी सेविकांना इंग्लिश लर्निंग प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच टाकवे बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात घेतला.

कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी पंचायत समिती उपसभापती शांताराम कदम, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय शेवाळे, बाल विकास प्रकल्प अधिकारी महेन्द्र वासनिक, टाकवे बुद्रुकचे सरपंच सुप्रिया मालपोटे, उपसरपंच स्वामी जगताप, टाकवे वडेश्वर भाजप गटाचे अध्यक्ष रोहिदास असवले, अविनाश असवले, भीमराव सावळे, माजी सदस्य नवनाथ आबेकर, ग्रामसेवक एस. बी. बांगर, पर्यवेक्षिका जुलेखा शेख, अलका म्हेत्रे, टाकवे 1 व 2 विभागाच्या सर्व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कार्यक्रमात लीफ फाऊंडेशन मार्फत अंगणवाडी सेविकांना मोफत इंग्लिश लर्निंगचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे अंगणवाडीतील मुलांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी अंगणवाडीतील सेविकांना मुलांना योग्य पद्धतीने इंग्लिश शिकवता यावे, यासाठी हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याप्रसंगी बोलताना शांताराम कदम म्हणाले, अंगणवाडीतील मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शासनाकडून आवश्‍यक ती सर्व मदत केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)