अंगठा टेकवा रॉकेल मिळवा

पुढील आठवड्यात नियतन होणार सुरू : काळ्या बाजाराला बसणार आळा

नगर – जिल्ह्यातील कोणताही लाभार्थी अनुदानित दराच्या केरोसिनपासून वंचित राहू नये, तसेच केरोसिनच्या काळ्या बाजाराला आळा बसून, केरोसिन नियतनात पारदर्शकता यावी, यासाठी राज्य सरकारने धान्यापाठोपाठ रॉकेलचेही-पॉस मशिनद्वारे वितरण करण्याचा निर्णय घेतला असून, पुढील आठवड्यात रॉकेल नियतन मिळण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप निचित यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आधार लिकिंग असल्यामुळे ज्या लाभार्थ्यांना गॅस आहे. त्यांना केरोसिन मिळणार नाही. जिल्ह्यात 780 किलो लिटर म्हणजेच 65 टॅंकरचे वितरण केले जाते. जिल्ह्यात 6 लाख 85 हजार लाभार्थी असून, यातील रॉकेल पात्र लाभार्थ्यांची संख्या तीन लाख 98 हजार आहे. पॉस मशिन जुलै 2017 आले व मार्च 2018 ला धान्य वितरण प्रणाली सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात धान्य व रॉकेल दुकानांतून रॉकेल वितरण केले जाणार आहे. त्यानंतर केवळ केरोसिन दुकानांतून नियतन सुरू केले जाणार आहे.

स्वस्त धान्य दुकानांतील धान्य वितरणातील काळ्याबाजाराला आळा घालण्यासाठी, तसेच या पद्धतीत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी धान्य वितरण ऑनलाइन करण्यात आले आहे. धान्य दुकानात पॉस मशिन बसविण्यात आल्या आहेत. या मशिनद्वारेच लाभार्थ्यांना धान्य दिले जात आहे. त्यापाठोपाठ आता रॉकेलही याच पद्धतीने देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

वितरण प्रणालीत राहात्याची विभागात आघाडी

जिल्ह्यात पॉस मशिनद्वारे धान्य वितरण करण्यात आल्याने धान्याच्या काळ्याबाजाराला आळा बसत आहे. जिल्ह्यात 6 लाख 85 हजार कार्डधारक असून, यातील 5 लाख 21 हजार 324 कार्डधारकांना धान्याचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात पॉस मशिनद्वारे धान्य वितरण प्रणालीमध्ये राहाता तालुक्‍याची विभागात आघाडी असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप निचित यांनी सांगितले.

तालुकानिहाय केरोसिन परवानाधारक

अकोले-159, संगमनेर-199, कोपरगाव-156, राहाता-84, श्रीरामपूर-117, राहुरी-111, नगर-202, नेवासे-204, पाथर्डी-182, शेवगाव-150, श्रीगोंदे-129, पारनेर-218, कर्जत-135, जामखेड-143, नगर शहर-108 यात केवळ केरासिन विक्रेते 1 हजार 474 तर स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन विक्रेते 823 आहे.

अनुदानित दराचे रॉकेल केवळ बिगर गॅसजोडणी शिधापत्रिकांनाच देणे बंधनकारक आहे. त्यासाठी गॅसजोडणी असलेल्या रेशनकार्डना अनुदानित दराच्या केरोसिनमधून वगळण्यासाठी गॅस स्टॅम्पिंग मोहीम राज्यात सुरू आहे. गॅसजोडणी मंजूर करताना रेशनकार्ड बंधनकारक नसल्याने सर्व गॅसजोडणी रेशनकार्डची माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे गॅस स्टॅम्पिंग मोहिमेतही अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणींमुळे रॉकेल केवळ बिगर गॅसजोडणी रेशनकार्डनांच मिळावे, यासाठी पहिल्या टप्प्यात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पॉस मशिनद्वारे रॉकेल वितरणाचा निर्णय घेण्यात आला होता.

या ठिकाणी हा निर्णय यशस्वी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर संपूर्ण राज्यात हा निर्णय आता लागू करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यभरातील दुकानांतून इ-पॉसद्वारे रॉकेल दिले जाणार आहे. जिल्ह्यात या योजनेस सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यात धान्य व रॉकेल एकत्रित वितरीत केले जाते. अशा दुकानांतून इ-पॉसद्वारे रॉकेल दिले जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)