सातारा – संगम माहुली गावातील तंटामुक्ती समितीने सातारा तालुक्‍यात प्रथम क्रमांकांचे पारितोषिक मिळविले आहे. या वर्षी संगम माहुली गावातील प्रतिष्ठित शेतकरी नारायण गरुड यांची तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. एका प्रतिष्ठित शेतकऱ्याची अध्यक्ष म्हणून निवड करून संगम माहुली गावाने आदर्श निर्माण केला आहे.

या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टीचे सातारा तालुका उपाध्यक्ष राहूल शिवनामे यांनी अभिनंदन केले. तसेच संगम माहुली ग्रामपंचायतीचे संरपच रमेश साबळे व उपसरपंच प्रिया सुंयवशी व सर्व ग्रामपंचायत सदस्य व संगम माहुली गावातील पोलीस पाटील धोत्रे यांनी अभिनंदन केले. यावेळी युवा नेते अविनाश कोळपे यांनी अंकुश गरूड यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)