अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट स्पर्धा : पर्सिस्टंट सिस्टीमस्‌ची आगेकुच

पुणे – आयडीयाज्‌ अ सास कंपनी तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ 14व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2017-18 स्पर्धेत अँड टी इन्फोटेक संघाने गालाघर संघाचा, तर पर्सिस्टंट सिस्टीमस्‌ संघाने सनगार्ड संघाचा पराभव करत आगेकुच केली.

पुना क्‍लब क्रिकेट मैदान व पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत अमित सिंगच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर एल अँड टी इन्फोटेक संघाने गालाघर संघाचा 46 धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना एल अँड टी इन्फोटेक संघाने 19.3 षटकात 7 बाद 146 धावा केल्या. स्नेहल खामणकरने 37, तर अमित सिंगने 23 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. 146 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अमित सिंग व हिमांशू शर्मा यांच्या अचूक गोलंदाजीपुढे गालाघर संघ 20 षटकात 8 बाद 100 धावांपर्यंत मजल मारू शकला.

-Ads-

अमित सिंगने 3, तर हिमांशू शर्माने 2 गडी बाद करत संघाला विजय मिळवून दिला. अमित सिंग सामनावीर ठरला.
दुसऱ्या लढतीत अभिजित सावंतच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पर्सिस्टंट सिस्टीमस्‌ संघाने सनगार्ड संघाचा 28 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पर्सिस्टंट सिस्टीमस्‌ संघाने 19.5 षटकात सर्वबाद 126 धावा केल्या. कौस्तूभ काळे व पौरीक पटेल यांनी प्रत्येकी 24, तर सुशांत बन्सलने 28 धावा करून संघाला 100 धावांचा टप्पा पार करून दिला. 126 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अभिजित सावंतच्या भेदक गोलंदाजीपुढे सनगार्ड संघ पाच चेंडू बाकी असताना सर्वबाद 98 धावांत गारद झाला. अभिजित सावंतने 18 धावांत 4 गडी बाद केले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
एल अँड टी इन्फोटेक- 19.3 षटकात 7 सर्वबाद 146 धावा(स्नेहल खामणकर 37, अमित सिंग 23, शुभम शर्मा 21, चिन्मय जोशी 2-23, तन्मोय एक्रॅय 2-27, रोशन कदम 4-29) वि.वि गालाघर- 20 षटकात 8 बाद 100 धावा(तन्मोय एक्रॅय 40, अमित सिंग 3-15, हिमांशू शर्मा 2-18) सामनावीर- अमित सिंग.
पर्सिस्टंट सिस्टीमस्‌- 19.5 षटकात सर्वबाद 126 धावा(विशाल पवार 22, कौस्तूभ काळे 24, पौरीक पटेल 24, सुशांत बन्सल 28, अभिजित सावंत 23, रोहित बाटलीया 2-24) वि.वि सनगार्ड-19.1 षटकात सर्वबाद 98 धावा(नितिन सप्रे 33, अभिजित सावंत 4-18, सुशांत बन्सल 2-15) सामनावीर- अभिजित सावंत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)