अंकिता शहा यांना जावडेकर पुरस्कार प्रदान

इंदापूर – येथील नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांना उमाबाई शंकर जावडेकर पुरस्कार जावडेकर ट्रस्ट चे विश्वस्त पद्माकर जावडेकर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळाचे माजी मानद संचालक तेज निवळीकर यांच्या हस्ते पुरस्कार व मानपत्र प्रदान करून त्यांना गौराविण्यात आले. इंदापूर येथील श्री नारायणदास रामदास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (विज्ञान) इंदापूर आणि वासंती श्‍यामसुंदर जावडेकर मेमोरियल ट्रस्ट, इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हायस्कूलच्या प्रांगणात हा सन्मान सोहळा पार पडला. नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी स्वच्छ ,सुंदर व हरित तसेच चकाचक इंदापूर करण्यासाठी केलेल्या योगदानासाठी वासंती श्‍यामसुंदर जावडेकर मेमोरियल ट्रस्ट च्या वतीने मानपत्र, रोख दहा हजार आणि शाल श्रीफळ देवून त्यांचा सम्मान करण्यात आला.अंकिता शहा यांनी पुरस्काराची रक्कम इंदापूर नगर परिषदेकरीता नगरसेवक भरत शहा यांच्याकडे सुपुर्त केली. यावेळी विश्‍वस्त सुषमा जावडेकर, प्रकाश जावडेकर, संस्थेचे सचिव मुकुंद शहा, प्रशालेचे माजी मुख्याध्यापक अरविंद गारटकर, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, प्राचार्य तुषार रंजनकर, नगरसेवक भरत शहा, मुख्याध्यापक विकास फलफले, ज्ञानदेव घोगरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पद्माकर जावडेकर, तर सूत्रसंचालन कालठण प्रशालेचे माजी मुख्याध्यापक किरण जाधव यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)