अंकिता रैनाला अखेर कांस्यपदक 

पालेमबंग: भारताची अव्वल महिला एकेरी टेनिसपटू अंकिता रैनाला आशियाई क्रीडास्पर्देतील महिला एकेरी टेनिसमध्ये अखेर कांस्यरपदकावर समाधान मानावे लागले. या कामगिरीमुळे आशियाई स्पर्धेत एकेरीत पदक जिंकणारी अंकिता केवळ दुसरी भारतीय महिला ठरली. याआधी सानिया मिर्झाने 2006 आशियाई स्पर्धेत रौप्यपदक जिंकताना भारताकडून सर्वोत्तम कामगिरी नोंदविली आहे. तसेच सानियाने 2010 आशियाई स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती.
अंकिताने काल बीट्रिश गुमुल्यावर पिछाडीवरून संघर्षपूर्ण विजयाची नोंद करताना विजयी सलामी दिली होती. तसेच हॉंगकॉंगच्या युडिस चोंगला पराभूत करताना तिने उपान्त्य फेरीत धडक मारली होती. स्पर्धेतील सर्वोच्च मानांकित खेळाडू थायलंडची लुकसिका कुमखुम हिला धक्‍कादायकरीत्या पराभव पत्करावा लागल्यामुळे अंकिताला सुवर्णपदकासाठीही संधी होती. परंतु उपान्त्य फेरीत चीनच्या झांग शुआईविरुद्ध दोन सेटच्या कडव्या झुंजीनंतर अंकिताला 4-6, 6-7 (6-8) असा पराभव पत्करावा लागल्याने तिला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले.
दरम्यान रोहन बोपण्णा व दिविज शरण या भारतीय जोडीनेही पुरुष दुहेरीत उपान्त्य फेरी गाठल्यामुळे भारताच्या आणखी एका निश्‍चिती झाली आहे. तसेच मिश्र दुहेरीत रोहन बोपण्णा व अंकिता रैना या भारतीय जोडीने युडिस वोंग चोंग व चुन हुन वोंग या हॉंगकॉंगच्या जोडीचे आव्हान मोडून काढताना उपान्त्यपूर्व फेरी गाठली आहे.
रामकुमार रामनाथनने हॉंगकॉंगच्या वोंग होंग किट याचा कडवा प्रतिकार 6-0, 7-6 असा कडव्या झुंजीनंतर मोडून काढताना पुरुषांच्या दुहेरीत उपउपान्त्यपूर्व फेरी गाठली, तसेच प्रजनेश गुणेश्‍वरननेही इंडोनेशियाच्या रिफकी फित्रियादीची झुंज 6-2, 6-0 अशी संपुष्टात आणताना उपउपान्त्यपूर्व फेरी गाठली. महिला एकेरीत करमान कौर थंडीनेही मंगोलियाच्या जारगल आल्तानसेरगाईचा 6-1, 6-0 असा पराभव करीत आगेकूच केली.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)