अँडरसन-ब्रॉड यांच्यावरच मदार

साऊदम्प्टन – अव्वल फिरकी गोलंदाज मोईन अलीने अप्रतिम कामगिरी करताना भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला सनसनाटी विजय मिळवून दिला. या विजयामुळे इंग्लंडने ही मालिकाही 3-1 अशी जिंकली. परंतु येत्या शुक्रवारी सुरू होत असलेल्या मालिकेतील अखेरच्या पाचव्या कसोटी सामन्यातही विजय मिळविण्यासाठी इंग्लंड संघ उत्सुक असून त्यासाठी त्यांची मदार जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड या वेगवान गोलंदाजांवर असल्याचे इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांनी सांगितले.

अँडरसन आणि ब्रॉड हे दोघे या मालिकेतील सर्वाधिक यशस्वी गोलंदाज असून त्यांनी गोलंदाजीचा सर्वाधिक ताण घेतला आहे. त्यामुळे हे दोघेही निश्‍चितपणे थकले आहेत. येत्या 48 तासांत त्यांची तंदुरुस्ती आणि विश्रांतीनंतर त्यांना कितपत ताजेतवाने वाटत आहे, हे पाहिल्यावरच त्यांच्या समावेशाबद्दल अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे सांगून बेलिस म्हणाले की, या मालिकेनंतर श्रीलंका दौऱ्यापूर्वी या दोघांना पुरेशी विश्रांती मिळणार आहे.

तसेच श्रीलंका व वेस्ट इंडीज दौऱ्यांमध्येही बरेच अंतर आहे. केवळ कसोटी क्रिकेट खेळत असल्याने त्यांच्यावर अवाजवी ताण पडणार नाही असा मला विश्‍वास वाटतो. अँडरसन आणि ब्रॉड हे आगामी काळात कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणार आहेत यात मला शंका नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)