दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा दारूण पराभव

अँडरसन आणि ब्रॉडसमोर भारतीय फलंदाजांची सपशेल शरणागती 
लंडन: पहिल्या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर दुसऱ्या कसोटीतही भारतीय फलंदाजीची दैना सुरुच आहे. त्यातही सलामीवीरांकडून होणारी निराशाजनक कामगिरी हा भारतासाठी मोठा चिंतेचा विषय ठरली आहे. इंग्लंडने आपला पहिला डाव 7 बाद 396 धावांवर घोषीत केल्या नंतर दिवसाखेर भारतीय संघ 130 वर सर्वबाद झाला. इंग्लडने कसोटी मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे.
तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस 250 धावांची आघाडी घेतल्यानंतर, हवामान पाहता इंग्लंडचा संघ आपला डाव घोषित करेल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र इंग्लंडने चौथ्या दिवसाच्या सुरुवातीच्या सत्रातही फलंदाजी करणं पसंत केलं. यावेळी दोन्ही फलंदाजांनी फटकेबाजी करत संघाला 400 धावा करुन देण्याचा प्रयत्न सुरू केला. या प्रयत्नात 40 धावांवर खेळणाऱ्या करनला बाद करत हार्दीक पांड्याने इंग्लंडला सातवा धक्का दिला. त्यानंतर चौथ्या दिवशी इंग्लंडच्या संघाने 7 बाद 396 या धावसंख्येवर आपला डाव घोषित केला असून, पहिल्या डावात इंग्लंडने 289 धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंडने आपला डाव घोसीत केला तेंव्हा तिसऱ्या दिवशी आपले पहिले शतक झळकावीनारा वोक्‍स 177 चेंडूत 21 चौकारांच्या मदतीने 137 धावा करुन नाबाद राहिला.
हा कसोटी सामना अनिर्णित राखायचा असल्यास उरलेल्या दिवसाच्या खेळात संयमीपणे फलंदाजी करणं भारतीय फलंदाजांसाठी क्रमप्राप्त झालेलं असताना भारतीय सलामीवीरांनी पुन्हा निराश केले. मुरली विजय पहिल्या डावा प्रमाणेच दुसऱ्या डावातही शुन्यावरच बाद झाला. याही डावात त्याला जेम्स अँडरसनने बाद केले. दरम्यान लॉर्डस मैदानावर विजयहा अँडरसनचा 100 वा बळी ठरला. विजय बाद झाल्यानंतर दुसरा सलामीवीर लोकेश राहुलही केवळ 10 धावा करुन परतला. त्यामुळे 289 धावांच्या पिछाडीवरून फलंदाजी करायला उतरलेल्या भारतीय संघाची 2 बाद 13 अशी झाली.
त्यानंतर चेतेश्‍वर पुजारा आणि चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेला भारताचा उपकर्णधार अजिंक्‍य रहाणयांची जोडी मैदानात काहीकाळ टिकली होती. मात्र स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर जेनिंग्जकडे झेल देत रहाणे 13 धावा करुण माघारी परतला. तर स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन पुजाराही लागलीच माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहलीने हार्दिक पांड्याच्या मदतीने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर तो झेलबाद होऊन माघारी परतला. त्या पाठोपाठ दिनेश कार्तिकही माघारी परतल्यामुळे भारताचा संघ अधिकच अडचणीत सापडला आहे.
https://twitter.com/HomeOfCricket/status/1028683054062227457

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)