अँटीबायोटिक्‍सची समस्या

डॉ. धवल शहा

प्रतिजैवकांच्या वापराबद्दलचा जनतेचा दृष्टिकोन चिंताजनकच आहे. सन 2011 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या एका अभ्यासानुसार 53 टक्के भारतीय प्रिस्क्रिप्शनशिवाय प्रतिजैवके घेतात. यातील आणखी दु:खद भाग म्हणजे हे वर्तन ग्रामीण भागापुरते किंवा तिसऱ्या फळीतील शहरांपुरते मर्यादित नाही, तर शहरी भागात व दुसऱ्या फळीतील शहरांमध्येही हेच आढळून येते.

प्रतिजैवकांच्या अति तसेच अनियमित वापरामुळे भारतात निर्माण झाली आहे मायक्रोबायल प्रतिकाराची समस्या. भारतीयांचा नैसर्गिक कल प्रादुर्भाव होण्याकडे असल्याने ते प्रतिजैवक प्रतिकाराला (ऍण्टिबायोटिक रेझिस्टन्स) बळी पडले आहेत. बऱ्याचदा वाटेल तशी आणि गरज नसताना, म्हणजे अगदी साध्या सर्दीसाठी किंवा डायरियासाठी प्रतिजैवके वापरली जातात. सरकार, शिक्षणतज्ज्ञ आणि वैद्यकीय व्यावसायिकांनी हा गैरवापर थांबवण्यासाठी प्रयत्न केले असले, तरी अजून खूप काही करणे गरजेचे आहे.

आधुनिक वैद्यकीय व्यवसायाचा पाया असलेली प्रतिजैवके निष्प्रभ ठरू लागली, तर साधे प्रादुर्भाव व शस्त्रक्रियाही प्राणघातक होण्याचा धोका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आकाशवाणीवरून राष्ट्राला उद्देशून केल्या जाणाऱ्या मासिक भाषणात मन की बातमध्ये काही दिवसांपूर्वी प्रतिजैवकांच्या अतिवापराबद्दल चिंता व्यक्‍त केली होती. लोकांनी डॉक्‍टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय प्रतिजैवके घेऊ नयेत, अन्यथा ही समस्या व्यक्तीची तर असेलच, शिवाय संपूर्ण समाजाचीही होईल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले होते.

प्रतिजैवकांच्या वापराबद्दलचा जनतेचा दृष्टिकोन तर चिंताजनकच आहे. सन 2011 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या एका अभ्यासानुसार 53 टक्के भारतीय प्रिस्क्रिप्शनशिवाय प्रतिजैवके घेतात. यातील आणखी दु:खद भाग म्हणजे हे वर्तन ग्रामीण भागापुरते किंवा तिसऱ्या फळीतील शहरांपुरते मर्यादित नाही, तर शहरी भागात व दुसऱ्या फळीतील शहरांमध्येही हेच आढळून येते.

अमली पदार्थाचा अपवाद वगळला तर बहुतेक औषधे भारतामध्ये सहज उपलब्ध आहेत. त्यांच्या विक्री किंवा वापराचे नियमन केले जात नाही. अशा पद्धतीने प्रतिजैवकांचा बेछूट वापर केल्यामुळे, प्रतिजैवक प्रतिकाराची समस्या वाढते.
यामध्ये रुग्णांच्या सवयींचाही मोठा वाटा आहे. प्रतिजैवकांचा कोर्स पूर्ण करण्याऐवजी एकदा का लक्षणे कमी झाली की ते औषधे घेणे सोडून देतात. याचा परिणाम म्हणून शरीरात उरलेले जीवाणू प्रतिकारक यंत्रणा विकसित करतात.
सन 2011 मध्ये प्रसिद्ध झालेल्या इंडियन जर्नल ऑफ मेडिसिनमधील माहितीनुसार, औषधे दिलीच जातात ती चुकीच्या डोस आणि कार्यकाळासाठी. त्याचप्रमाणे ती घेण्याच्या वेळाही चुकीच्या दिल्या जातात. काही औषधे अनावश्‍यक असतात, तर काहींची अन्य औषधांसोबत घातक पद्धतीने प्रतिक्रिया होते.

नवीन प्रतिजैवके तयार करण्यासाठी मोठया प्रमाणात पैसा खर्च होतो एवढयापुरता हा प्रश्‍न मर्यादित नाही, तर संशोधनासाठी, अभ्यासासाठी आणि एखादा नमुना उपचारासाठी तसेच पोटात घेण्यासाठी तयार करण्यासाठी खूप वेळही द्यावा लागतो. नवीन प्रतिजैवके विकसित करणे खर्चिक असेल, तर ती मोठया प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि मागणी – पुरवठयाचे गणित विस्कटते. मागणी आणि पुरवठयातील अंतर ही साथीची सुरुवात ठरते.
हे भीतीदायक चित्र बघता, डिजिटल प्रिस्क्रिप्शन हा या समस्येवर चपखल उपाय ठरत आहे. यामुळे सर्व स्तरांवरील गोंधळ दूर होऊन योग्य रुग्णाला, योग्य औषध, योग्य प्रमाणात देणे शक्‍य होते. प्रतिजैवकाला शरीराकडून प्रतिसाद न मिळण्याची (ऍण्टिबायोटिक रेझिस्टन्स) समस्या टाळण्यासाठी तसेच ही समस्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिजैवकांचा योग्य वापर आवश्‍यक आहे आणि रुग्णाने कोणती औषधे घेतली याची संपूर्ण डिजिटल नोंद ठेवून ई-फार्मसीज हे करू शकतात.

ई-फार्मसी प्रारूप वापरण्याचे काही थेट फायदे खालीलप्रमाणे –
ई-प्रिस्क्रिप्शन मॉडेलमध्ये, प्रत्येक व्यवहाराची नोंद ठेवून पाठपुरावा केला जातो. प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधाची विक्री करण्याची शक्‍यताच यात उरत नाही. या नोंदीची सहजपणे पडताळणी करता येते.


नोंदणीकृत फार्मासिस्ट आणि परवानाप्राप्त फार्मसी दुकानांतून या औषधांची विक्री होते.


ई-प्रिस्क्रिप्शन हा आयआयपीएचा भाग असून, एक्‍स संवर्गातील किंवा सवय लागू शकेल अशा औषधांची विक्रीही यामुळे रोखली जाते.


एखादे औषध मागे घेण्यासाठीही ई-प्रिस्क्रिप्शन पद्धत सर्वोत्तम आहे. कारण, यात रुग्णाचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ई-मेल या सर्व माहितीची नोंद ठेवली जाते. प्रत्येक विक्रीचा बॅच क्रमांक, पावती क्रमांक नोंदवून घेतला जातो आणि विक्री परवानाप्राप्त फार्मसीकडूनच होईल, यावर लक्ष ठेवले जाते.


अशा प्रकारे आपण जी औषधे घेतो, ती वैद्यकशास्त्रानुसार आहेत ना, याची खात्री करणेही आवश्‍यकच असते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)